Ad will apear here
Next
नेताजींच्या पराक्रमाच्या साक्षीदार वस्तूंचे लाल किल्ल्यात संग्रहालय
स्वातंत्र्ययुद्धाशी संबंधित तीन संग्रहालयांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

नवी दिल्ली :
भारतीय स्वातंत्र्ययुद्धाशी संबंधित असलेली तीन संग्रहालये लाल किल्ल्यात सुरू करण्यात आली असून, २३ जानेवारी २०१९ रोजी त्यांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. ही संग्रहालये नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेना, जालियनवाला बाग हत्याकांड आणि १८५७चे स्वातंत्र्यसमर या विषयांना वाहिलेली आहेत.

२३ जानेवारी या नेताजींच्या जयंतीचे औचित्य साधून नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. नेताजींनी वापरलेली लाकडी खुर्ची, तलवार, मेडल्स, बॅजेस, गणवेश अशा नेताजींशी आणि आझाद हिंद सेनेशी संबंधित अनेक वस्तू या संग्रहालयात आहेत. ब्रिटिशांनी आझाद हिंद सेनेवर चालवलेल्या खटल्यांची सुनावणी लाल किल्ल्यात घेण्यात आली होती. ही सेना देशविरोधी कारवाया करते, असे लोकांना भासवू देण्याचा ब्रिटिशांचा उद्देश त्यामागे होता; मात्र प्रत्यक्षात त्यांचा हेतू सफल झाला नाही. 

पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन झालेले ‘याद-ए-जालियान’ हे संग्रहालय जालियनवाला बाग हत्याकांडाच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आले आहे. या हत्याकांडाला २०१९मध्ये १०० वर्षे होत आहेत. या हत्याकांडाचा इतिहास या संग्रहालयाच्या माध्यमातून अनुभवता येणार आहे. तसेच भारतीय जवानांनी पहिल्या जागतिक महायुद्धात गाजविलेले शौर्य आणि केलेल्या त्यागाची माहितीही या संग्रहालयातून मिळणार आहे. 

तिसरे संग्रहालय १८५७च्या स्वातंत्र्यसमराशी निगडित आहे. या युद्धात भारतीयांनी गाजविलेला पराक्रम आणि त्यागाची माहिती या संग्रहालयातून लोकांना मिळणार आहे. 

संबंधित घटना किंवा काळाशी निगडित फोटो, चित्रे, वृत्तपत्रांची कात्रणे, पुरातन सार्वजनिक कागदपत्रे, ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिप्स, अॅनिमेशन आणि मल्टिमीडिया अशा विविध माध्यमांतून दर्शकांना इतिहासाची अनुभूती घेता येणार आहे. 

(हेही जरूर वाचा : देशाच्या स्वातंत्र्यात आझाद हिंद सेनेचे योगदान महत्त्वाचे)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/WZKWBW
Similar Posts
मोदींच्या शपथविधीसाठी मराठमोळ्या शेफची ‘रेसिपी’ नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी सलग दुसऱ्यांदा शपथ घेणार असून, आज (३० मे २०१९) होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला जगभरातील अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह देशभरातील मान्यवर नेते आणि विविध क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती उपस्थित राहणार आहेत. या महत्त्वाच्या सोहळ्याकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे
‘नवभारत निर्मितीच्या मार्गावर जाणारा अर्थसंकल्प’ नवी दिल्ली : देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी, पाच जुलै रोजी त्यांचा पहिला अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अर्थसंकल्पात शेती, ग्रामीण विकास, कौशल्य विकास, गरिबांना सोयी-सुविधा, संशोधन, डिजिटल अर्थव्यवस्था, महिला सक्षमीकरण यावर भर देण्यात आला आहे. ‘हा
‘ट्रेन १८’चे नामकरण ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ नवी दिल्ली : ‘संपूर्ण भारतीय बनावटीच्या पहिल्या इंजिनविरहित ‘ट्रेन १८’चे नाव ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ असे करण्यात आले आहे,’ अशी माहिती रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रविवारी, २७ जानेवारी २०१९ रोजी नवी दिल्ली येथे दिली.
पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशभरातून मिळालेली स्मृतिचिन्हे, मानचिन्हे आणि भेटवस्तू आता तुमच्या घरातही असू शकतात. होय! हे खरे आहे. कारण पंतप्रधानांना मिळालेल्या विविध स्मृतिचिन्हांचा आणि भेटवस्तूंचा लिलाव आयोजित करण्यात आला असून, त्यातून उभा राहणारा निधी ‘नमामि गंगे’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी दिला जाणार आहे

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language